brain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले – NNL
परभणी -नांदेड ग्रिनकॉरीडॉर श्री गंगा हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण
नांदेड/परभणी| परभणी शहरांतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एकोणीस वर्षीय सार्थक प्रवीण नवले (जिंतूर) या तरुणांचा ब्रेन डेड मुळे मृत्यू झाला . त्याच्या नातेवाईकांनी अवयव दान केले . त्यात विलास मारोती कुंटुरे (वय ३८) या रुग्णांची किडनी निकामी झाली होती तो डायलिसिस वर मृत्यूशी झुंज देत होता. सार्थकच्या कुटुंबियांमुळे विलास यांना किडनी मिळाली. ग्रीन करिडॉर करत नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटलमध्ये तो अवयव आणण्यात आला .प्रसिद्ध किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ शहाजी जाधव वटीमने रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण केले . ब्रेडडेड नवले या तरुणामुळे विलासच्या जीवन “सार्थक” झाले श्री गंगा चे संचालक डॉ राजेश्वर पवार, डॉ विजय कागणे व टीममुळे रुग्णाचे कुटुंब उभे राहिले.
नांदेड शहरातील श्री गंगा हॉस्पिटल मध्ये विलास मारोती कुंटूरे (वय ३८ वर्ष) हा युवक किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिस वर होता. तो गेल्या दहा वर्षा पासून डायलिसिसवर जगतो आहे .त्याने किडनी प्रत्यारोपण साठी प्रतीक्षेत होता दरम्यान परभणी येथील देवगिरी हॉस्पिटल मध्ये ब्रेनडेड मुळे सार्थक प्रविण नवले (वय १९ ) या जिंतूर येथील तरुणाचा बुधवार. २३ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या मन हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत ब्रेनडेड सार्थक यांच्या कुटुंबियांनी अवयवदान करावे. यासाठी देवगिरी हॉस्पिटलचे संचालक न्युरोसर्जन डॉ. एकनाथ गबाळे, न्युरोलॉजिस्ट डॉ. अतुल जाधव व छातीरोग तज्ञ डॉ. रामचंद्र कदम यांनी सार्थक च्या कुंटूबिंयाना अवयवदानाचे महत्व पटवून सांगितले.
त्यांना मृत्यूपश्चात अवयवदानासाठी हे कुटुंब तयार केले तदनंतर रितसर नोंदणी व प्रक्रीया पार पाडल्यानंतर नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलचा रुग्ण श्री विलास कुंटूरे यांच्यासाठी किडनी प्रत्यारोपण करावयाचे ठरले
त्यानुसार श्री गंगा हॉस्पिटलची संपूर्ण टिम परभणी येथे गुरूवार . २४ ऑक्टोबर रोजी रवाना झाली होती. गंगा हॉस्पिटलच्या व देवगिरी हॉस्पिटलच्या टिमने परिश्रम घेत सार्थक च्या किडनीचे परभणी ते नांदेड अस ग्रिनकॉरीडॉर अवघ्या ९० मिनिटात पूर्ण केले शहरातील शिवाजीनगर स्थित श्री गंगा हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्ण विलास कुंटूरे यावर यशस्वीरीत्या किडनी प्रत्यारोपण केले.
नवले कुटुंबाचा जो निर्णय घेतला होता तो रुग्ण विलास कुंटूरे यांच्या आयुष्यासाठी “सार्थक “ठरला सदरील रुग्णांस मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी किडनी प्रत्यारोपणांसाठी सहाय्य केले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी मानले किडनी तज्ञ डॉ.शहाजी जाधव व श्री गंगा हॉस्पिटलच्या संपूर्ण टिमचे आभार मानले आहेत. प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांच्यासह किडनी तज्ञ डॉक्टर डॉ. राजीव राठोड, डॉ.शिवराज टेंगसे या किडनी तज्ञांचे विशेष सहाय्य लाभले आहे हॉस्पिटलच्या टिम वर्कमुळेच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
शस्त्रक्रियेसाठी डॉ. राजीव राठोड, डॉ. शिवराज टेगसे, डॉ. प्रमोल हंबर्डे, डॉ. शहाजी जाधव, डॉ. जयश्री कागणे, डॉ. अंजली गोरे, डॉ. पवन, डॉ. सतीश राठोड, डॉ. सोनाली राठोड याची मदत झाली . हॉस्पिटलचे संचालक डॉ राजेश्वर पवार डॉ. विजय कांगणे, डॉ. संदीप गोरे, डॉ. लक्ष्मीकांत भोपळे, डॉ. मनीषा मुंडे, डॉ. सूचिता पेक्केमवार, डॉ. नामदेव चौरे, डॉ. चंदू पाटील, डॉ आशिष हटकर यानी प्रयत्न केले. ग्रीन करिडॉर साठीं नांदेड पोलिसांचे मोठे सहकार्य मिळाले .जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व टीमचे श्री गंगा हॉस्पिटलने आभार मानले
अवयवदान काळाची गरज
अवयव निकामी झाल्याने दरवर्षी असंख्य जीव गमवावे लागतात. हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, यकृत निकामी होणे व अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांना अवयव प्रत्यारोपण जीवनात दुसरी संधी देते जीवन आणि मृत्यूमधील अंतर कमी करू शकतो. अवयवांची मागणी ही पुरवठ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, ज्यामुळे अवयवदान होणे काळाची गरज आहे त्यासाठी समाजात जागृती होणे गरजेचे आहे असे आवाहन न्युरोसर्जन डॉ. लक्ष्मीकांत भोपळे डॉ. संदीप गोरे यांनी व्यक्त केले आहे.